ऑनलाईन शॉपिंग करा भरपूर पण, जरा जपून.

online shopping tips

दसरा आणि दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा नाही तर एन दिवाळीतच आपले दिवाळे निघतील.  दिवाळीच्या काळात ऑनलाईन शॉपींग करणार्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते, त्यामुळे  ऑनलाईन शॉपिंग करा भरपूर पण, जरा जपून.

दसरा आणि दिवाळी या सणाला आपल्या आवडत्या रंगाची, डिझायनची आणि लेटेस्ट फॅशनच्या वस्तू, कपडे आणि भरपूर अशा गोष्टी क्षणांत इंटनेटवर आपल्याला पहायला मिळतात आणि खरेदी ही करता येतात. पण, या आवडत्या वस्तू इंटरनेटवरुन ऑनलाईन शॉपिंग करताना करताना तुमची फसवणूक होऊ शकते.

ऑनलाईन शॉपिंग तस काही गैर नाही, पण, तुमच्या एका लहानश्या चुकीमुळे तुमच्या खिशातील हजारो रुपये तुम्हाला गमवावे लागतील. त्याकरता पुढील काळजी घेतल्यास तुम्ही फसवणूकी पासून वाचू शकाल.

online shopping tips
file photo

हे मुद्दे लक्षात ठेवा…
* सर्वात आधी ज्या वेबसाईट वरुन सुम्ही तुमची आवडती वस्तू खरेदी कराल, त्या वेबसाईच्या सर्वात खालच्या ठिकाणी वेरी साईन ट्रस्डेट अशा पद्धतीचं सर्टीफिकेट त्या वेबसाईटवर दिलेलं आहे की नाही हे तपासून पहा
* ऑनलाइन खरेदीपूर्वी सुरक्षित खरेदी कशी करावी याबाब इंटरनेटवरुन माहिती घ्यावी
* ज्या कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करायचे आहे त्या कंपनीची आॅनलाईन खरेदी संदर्भाताल माहिती तपासावी
* ऑनलाईन प्रॉडक्ट विकणा-या कंपनीची किंवा वेबसाईटची सत्यता तपासून पाहावी. वेबसाइटवर दिलेली कंपनीची माहिती नीट वाचावी.
* ऑनलाइन खरेदी झाल्यानंतर आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बँकेची खरी वेबसाइट लिंक दिलेली असली तरच असे तपशील भरावेत.
* शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायच निवडावा
* खरेदी झाल्यानंतर आलेले ई-बिल तपासून घ्यावे
* शक्यतो थेट तुमच्या बँकेशिवाय आणि ऑनलाइन खरेदी कंपनीशिवाय इतर कोणत्याही मध्यस्थ ऑनलाईन वेबसाईटवरुन आर्थिक व्यवहार करू नयेत.
* मौल्यवान वस्तू स्वस्त दरात विकली जात असेल तर शक्यतो ती वस्तू विकत घेऊ नये. घ्यायचीच असेल तर, पुर्ण माहिती आणि खात्री झाल्या शिवाय ती वस्तू खरेदी करु नये
* काही झाल्यास खरेदी केलेली वस्तू किंवा पैसे परत मिळत असतील किंवा वस्तू बदलून मिळत असतील तरच ऑनलाईन खरेदी करा
* ऑनलाईन खरेदी करताना आपल्या क्रेडीट किंवा डेबिट कार्टचा पीन देवू नका, तसच सीसीव्ही नंबर आणि कार्डच्या मागील सिक्युरिटी नंबर, ग्रीड नंबर देवून नका ही सर्व माहिती तुम्ही स्वत: भरा ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही किमान हे नियम जरी पाळले तरी तुमची फसवणूक होण्यापासून दूर रहाल.