मोदींनी मला बराक म्हणून आवाज दिला आणि मला……..

modi barak omaba

टीम महाराष्ट्र देशा – मोदींनी मला बराक म्हणून आवाज दिला आणि मला ते आवडलं ‘ हे उद्गार आहेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांचे. ‘एचटी समीट 2017’मध्ये ते बोलत होते. करण थापर यांनी ओबामांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी मनमोकळेपणानं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

यावेळी ओबामांनी अगदी घरगुती गप्पाही मारल्या. ते म्हणाले त्यांना चिकन आणि डाळ बनवता येते. आणि डाळ बनवता येणारे ते पहिले अमेरिकन अध्यक्ष आहेत. त्यांना चपाती बनवता येते का विचारलं असता, ते म्हणाले मला रोटी बनवता येत नाही.

पंतप्रधान मोदींचा विविधतेतल्या एकतेवर विश्वास आहे. ते सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊ इच्छितात.     ओबामा म्हणाले, लोकशाहीला दहशतवाद हा मोठा धोका आहे. पण शस्त्र हे त्याला उत्तर नाही.

Loading...

मोदींकडे देशासाठी एक विचार आहे. मोदींप्रमाणे डाॅ. मनमोहन सिंग माझे चांगले मित्र आहेत.सोशल मीडियाबद्दल बोलताना ते म्हणाले, सोशल मीडिया प्रभावी आहे. पण त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. तो नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. ट्विटरवरचे आपसे फाॅलोअर्स कमी झाल्याचं त्यांनी म्हटलंय

1 Comment

Click here to post a comment