भारत फेसबुक वापरात जगात लई भारी

या प्रगत देशांना मागे टाकत भारत अव्वलस्थानी आहे.

भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या २४ कोटी रूपयांपेक्षा अधिक झाली आहे, यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीयांची संख्या अन्य देशांच्या लोकांपेक्षा अधिक झाली आहे. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, १३ पर्यंत फेसबुकवर येणाऱ्या २४.१ कोटी नेटीझन्स भारतातून आहेत, तर अमेरिकेत २४ कोटी नेटीझन्स फेसबुक वापरतात.

फेसबुकने काही दिवसाआधी घोषणा केली होती, जगभरात १ अब्ज लोक फेसबुक वापरतात, द नेक्स्ट वेबनुसार २०१७ च्या सुरूवातीला भारत आणि अमेरिकेत लोकांचं फेसबुक वापरणं वेगाने वाढलं. मात्र काही आकड्यांनुसार अमेरिकेपेक्षा भारतात फेसबुक वापरणं दुपटीने वाढलं.

मागील सहा महिन्यात फेसबुक वापणाऱ्यांची संख्या, भारतात २७ टक्क्यांनी वाढली आहे, तर अमेरिकेत त्या तुलनेने १२ टक्के वाढली. तरी देखील भारतातील एकूण लोकसंख्येच्या मानाने फार कमी लोक फेसबूक वापरतात, भारतातील केवळ १९ टक्के लोक फेसबुक वापरतात.

You might also like
Comments
Loading...