मनसेचा दणका ; “बुक माय शो”वर मराठीचा पर्याय

भारत हा जगामधील एकमेव असा देश आहे. जेथे अनेक प्रादेशिक भाषा वापरल्या जातात. त्यामुळे मोबाईल असो वा कोणतेही वेबसाईट किवा कोणतही अॅप अनेक प्रादेशिक भाषा तिथे समाविष्ट असतात. महाराष्ट्रातील मराठी भाषेविषयी  मनसे देखील तितकीच आग्रही आहे. आता पुन्हा एकदा या गोष्टीचा प्रत्यय आला आहे.

बुक माय शो या चित्रपट तिकीट बुकिंग अॅपवर मराठी भाषा हा पर्याय उपलब्ध नव्हता या विषयी बुक  माय शो  या अॅप आणि वेबसाईटमध्ये मराठी भाषा समाविष्ठ करून घेण्यासाठी निवेदन दिलं होतं. मनसेच्या पाऊलामुळे आता बुक माय शोवर मराठीचा पर्याय देण्यात आला आहे.

मनविसे मुंबई विद्यापीठ चिटणीस श्री साई हरिश्चंद्र आदमाने यांनी मनसे नेते मा. श्री बाळा नांदगावकर साहेब , विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.श्री आदित्य राजन दादा शिरोडकर साहेब , मा.श्री दत्तात्रय ( भाई ) बेळणेकर आणि भायखळा विधान सभा विभागध्यक्ष मा.श्री संजय (भाई ) नाईक साहेब यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या सह बुक माय शो च्या प्रशासनाला निवेदन दिलं होतं. तसंच त्यांना २४ तासांचा अवधीही देण्यात आला होता. परंतु अॅपच्या प्रशासनाच्या वतीने ३० दिवसांचा अवधी मागून घेण्यात आला. आणि त्यानंतर मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार बुक माय शो चा मोबाईल अॅप आणि वेबसाईट मध्ये त्यांनी मराठी भाषा समाविष्ट करून घेतली.

manse letter
file photo

 

You might also like
Comments
Loading...