पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याचा निर्धार  केलाच तर ….- हंसराज  आहिर

hansraj ahir

टीम महाराष्ट्र देशा – भारताने पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याचा निर्धार  केलाच तर आम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज  आहिर यांनी केले.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकव्यप्त काश्मीर पाकिस्तानचाच असल्याचे वक्तव्य गेल्या आठवड्यात केले होते. त्या पार्श्वभूमीवर अहिर यांनी हे व्यक्तव्य केले .