पत्नीला गर्भपाती करायचा असेल तर पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही-सुप्रीम कोर्ट

supreme court

टीम महाराष्ट्र देशा -गर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असा महत्त्वाचा निर्णय काल सुप्रीम कोर्टानं दिला आहे.गर्भपात करायचा की नाही हा अधिकार सर्वस्वी पत्नीचा आहे त्या पती हस्तक्षेप करू शकत नाही.
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं तसा निर्णय २०११ सालीच दिला होता. तो निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला. पत्नीला गर्भपाती करायचा असेल, कायद्यात बसत असेल, आणि डॉक्टरांकडून संमत असेल तर गर्भपात करता येईल, त्यात पतीची परवानगी घेण्याची आवश्यकताच नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं.

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं एका खटल्यात असा निर्णय दिला होता. महिला हे मुलं जन्माला घालण्याचं यंत्र नाहीयेत. असं निरीक्षण कोर्टानं तेव्हा नोंदवलं होतं. त्यानंतर महिलेचा पती सुप्रीम कोर्टात गेला. त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टांन हस्तक्षेप करायला नकार दिला आणि हायकोर्टाचा निर्णय काम ठेवला आहे.