पवार आडनाव काढा, तुम्हाला बारामतीमध्ये कुत्रासुद्धा विचारणार नाही- निलेश राणे

टीम महाराष्ट्र देशा- हल्लबोल यात्रेदरमन्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे यांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. त्यांना फडणवीस सरकारने मंत्रीपदाचे गाजर दाखवले आणि मंत्रीपद मिळेना म्हणून राणे हताश झाल्याची टीका अजित पवार यांनी केली होती.

Loading...

या टिकेला राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिले आहे. राणेसाहेबांनी जे काही मिळवले आहे. ते आपल्या कर्तुत्वावर मिळवले आहे. तुम्ही पवार आडनाव काढा तुम्हाला बारामतीमध्ये कुत्रंसुद्धा विचारणार नाही या शब्दात राणे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला. अजित पवारांनी कधीच मराठा समाजाची बाजू घेतली नाही. आरक्षण मराठा समाजाला मिळायला हवं असं कधी बोलले नाही. महाराष्ट्राच्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयांवर ठाम भूमिका अजित पवारांनी कधी घेतली नाही. 15 वर्षात सिंचन महाराष्ट्रात फक्त 2 टक्क्यावर ठेवलं… धरण भरणारे दादा असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

अजित पवार 2 महिने बिन खात्याचे मंत्री होते. मंत्रिपदासाठी काही करण्यामध्ये अजित पवारांचा पहिला नंबर लागतो कारण त्या काळात स्वतःलाच क्लीन चिट देऊन बिन खात्याचे मंत्री बनले आणि त्यांनी इतिहास रचला. असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.Loading…


Loading…

Loading...