योग्य मुलगी मिळताच लग्न करेल – राहुल गांधी

rahul-sonia

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ४७ वर्षांचे झाले आहेत. पण त्यांनी अजूनही लग्न केलेलं नाही. सतत राजकारणात व्यग्र असलेल्या राहुल यांना एका कार्यक्रमात प्रसिद्ध बॉक्सर विजेंद्र सिंह यानं लग्नाबद्दल छेडले. तेव्हा योग्य मुलगी मिळताच लग्न करेन, असं सांगत राहुल यांनी विजेंद्र सिंहचा प्रश्न टोलावून लावला.

राहुल गांधी यांना एका जाहीर कार्यक्रमातच विजेंद्र सिंह यानं ‘राहुल भैय्या लग्न कधी करणार?’ असा सवाल विजेंद्रनं केला. सर्वांसमक्ष विचारला गेलेला हा प्रश्न राहुल यांना टाळता आला नाही. मग त्यांनीही मोठ्या खुबीनं उत्तर देताना मूळ प्रश्न अनुत्तरितच ठेवला. हा खूपच जुना प्रश्न आहे, असं ते म्हणाले. पण विजेंद्र थांबला नाही. त्यानं प्रश्न सुरूच ठेवल

‘तुमच्या विवाहाची सर्वांनाच उत्सुकता आहे. तुम्ही पंतप्रधान झाल्यावरच लग्न करणार आहात का? त्यावर थोडं तरी सांगा? असा दुसरा सवाल विजेंद्रनं केला. ‘माझा नियतीवर विश्वास आहे. लग्न व्हायचं तेव्हा होईलच. योग्य मुलगी मिळताच लग्न करेन,’ असं राहुल म्हणाले. त्यामुळे ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.