चीनमध्ये राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांना होणार तीन वर्षांचा कारावास

टीम महाराष्ट्र देशा –एकीकडे भारतात राष्ट्रगीताला उभं राहायचं की नाही यावरुन वाद-विवाद सुरु असताना चीनने मात्र राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. चीनच्या संसदेत राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्यासंबंधी कायदा संमत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यानुसार राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांना तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते असं वृत्त स्थानिक वृत्तवाहिनी शिन्हुआने दिलं आहे.

चीनने राष्ट्रगीताचा वापर करण्यावरुन 2014 मध्येही नियम केले होते. नियमाअंतर्गत लग्न, अंत्यसंस्कार आणि मनोरंजन तसंच खासगी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताचा वापर केला जाऊ शकत नाही.