पंचायत समिती सभापतीपदाची लवकरच सोडत

टीम महाराष्ट्र देशा : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता या प्रक्रियेला प्रारंभ होईल.

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या बाबतीत त्यांना सद्यस्थिती लागु असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर लगेच येणाऱ्या दिवसापासून अडीच वर्षाच्या कालावधीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागसवगीचा प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमातीसह ) आणि महिला ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गीचा प्रवर्गासह ) यांच्यासाठी राखुन ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींच्या पदांचे आरक्षण सोडत पध्दतीने काढले जाणार आहे.

यात पंचायत समितीनिहाय सोडतीसाठी बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा नियोजन सभागृह येथे बैठक होणार आहे. या बैठकीला विविध पक्षाचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या