कर्जमाफी अर्ज अपलोडिंगमध्ये धुळे जिल्हा अव्वल

टीम महाराष्ट्र देशा –बँकेत कर्ज घ्यायला गेलेल्या शेतक-याला बहूतेक वेळा वाईट अनुभव येतो कर्जासाठी वारंवार फे-या माराव्या लागतात. मात्र धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याला अपवाद ठरली आहे. शेतक-यांच्या सन्मानासाठी जिल्हा बँकेच्या कर्मचा-यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रात्रंदिवस एक करीत शेतक-यांचा तात्काळ कर्ज मिळावे यासाठी परिश्रम घेतले आहे.

त्यामुळेच धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 100 टकके यशस्वी फाईल अपलोड करणारी राज्यातील पहिली बँक ठरली आहे. शासनाच्या ग्रीन यादीनुसार कर्जमाफीच्या रकमा शेतक-यांच्या खाती प्राधान्य क्रमाने जमा करण्यास यामुळे मदत होईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली असून, या योजनेच्या माध्यमातून बँकेने थकबाकीदार, नियमित फेड करणारे सभासद, पुनर्गठन केलेले सभासद आदींना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी युध्द पातळीवर परिश्रम घेतले आहेत.

बँकेने पीक कर्जासाठी सर्वाधिक कर्जपुरवठा केला. यासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहकार खात्याच्या मार्गदर्शनाखाली सतत चार महिने नियमित वेळेत बंधन न पाळता कामकाज करीत होते. त्यामुळे राज्याच्या सर्व जिल्हा बँकामध्ये कर्जमाफीचा डाटा यशस्वीपणे अपलोड करण्यात बँकेचा प्रथम क्रमांक आला आहे. शासनाचा निर्णय जिल्हा बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँकेने जिल्हयातील सर्व शेतकरी सभासदांची अचुक माहिती मागवून घेतली. त्यावर बँकेने संगणक तज्ञ एजन्सीला कर्जमाफी यादीचे काम देवून बँकेच्या मुख्यालयात 45 कर्मचा-यांकडून संगणकावर कामकाज करण्यात आले.

बँकेची कर्जमाफीची फाईल अपलोड झाली असून, आता शासनाकडून वेळोवेळी ग्रीन लिस्ट प्रसिध्द होईल आणि शासन निधी जिल्हा बँकेकडे वर्ग होईल. त्याच्रपमाणे शेतक-यांच्या खात्या सदरची रक्कम जमा करीत त्यांना कर्जमुक्त केले जाईल. यामुळे 1 लाख 50 हजारांहून अधिक रक्कम असलेल्या सभासदांनी उर्वरित कर्जाची रक्कम दि.31 डिसेंबर 2017 अखेर बँकेत भरणा करावी यामुळे दीड लाख रुपये कर्जमाफीचा फायदा मिळेल, असेही आवाहन कदमबांडे यांनी केले आहे