नोकर भरती परीक्षेत एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार

टीम महाराष्ट्र देशा –   कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरून एस टी महामंडळ कायमच चर्चेचा विषय झाला आहे. आणखी एक वाद आता समोर आला आहे तो म्हणजे एस टी महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या नोकर भर्ती प्रक्रियेत मध्ये. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सरळ सेवा परीक्षेत २०१६ १७ च्या उमेदवारांना केंद्र देताना घोळ झाला आहे. पहिल्या तीन पर्यायांपैकी न निवडलेले आणि मुळ ठिकाणापासून पाचशे ते सहाशे किलोमीटर दूर केंद्र देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनी लिपिक पदासाठी अर्ज केला आहे. त्यात परीक्षा देण्यासाठी केंद्र म्हणून शहर, अशी माहिती भरायची आहे. त्यासाठी तीन पर्याय आहेत. काही विद्यार्थ्यांनी जी शहर निवडली आहेत त्यापैकी एकही शहर त्या विद्यार्थ्यांना केंद म्हणून आलेच नाहीत त्यामुळे परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. एस टी महामंडळाच्या या भोंगळ नियोजनामुळे विद्याथीची चांगलीच फजिती झाली आहे व नाहक त्रास देखील सहन करवा लागत असल्याची प्रतिक्रिया विद्याथी वर्गातून उमटताना पाहायला मिळत आहे.

मी अर्ज भरताना माझ गाव सांगली, सातारा व पुणे अशी शहर निवडकी होती मात्र आता माझा केंद्र नाशिक ला आले आहे. तिथे कोणी ओळखीचे नसल्यामुळे राहण्याची मोठी गैरसोय होणार आहे. त्यात प्रवासाचा आणखीनच त्रास होणार आहे. एस टी प्रशासनाने नेमून दिलेल्या शहरांमध्येच केंद्र द्यायला पाहिजे होते.
-स्वप्नील पवार ( परीक्षार्थी )