देशात मनसे स्टाईल चालणार नाही, लोकशाही स्टाईलच चालेल- संजय निरुपम

टीम महाराष्ट्र देशा – मनसेची गुंडगिरी सुरु राहायला हवी, असा भाजपचा प्लॅन आहे. मात्र या देशात मनसे स्टाईल चालणार नाही, लोकशाही स्टाईलच चालेल. हाणामारी हा काही पर्याय असू शकत नाही, हे मी मनसेला सांगू इच्छित आहे,” असं संजय निरुपम मनसे आणि भाजपला उद्देशून म्हणाले.गरिबांसाठीच्या पोटा-पाण्याच्या प्रश्नात भाषेचा विषय आणू नये. फेरीवाल्यांमध्ये हिंदी-मराठी असा वाद आणू नका, सर्व भाषिक फेरीवाले आहेत, असे सांगत निरुपम यांनी मनसेवर निशाणा साधला.मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनसेची गुंडगिरी सुरु असल्याचा आरोप, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात ते बोलत होते.