fbpx

फेरीवाल्यां विरोधात पुण्यातही मनसेचे खळखट्याक

manse photo

टीम महाराष्ट्र देशा– एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेकडून टार्गेट करण्यात आले.

पुण्यातील फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनाला कालच दोन दिवसांचा अवधी दिला असताना आज दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राजाराम पुलावरील फेरीवाल्यांच्या विरोधात आपले अस्त्र उगारले. या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांचे सामान, फळे व इतर वस्तू रस्त्यावर इतस्ततः फेकून माणसे कार्यकर्त्यांनी माणसे स्टाइलने आंदोलन केले.

मुंबईमधील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन केले जात आहे. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेच्या टार्गेटवर आले आहेत. फेरीवाल्यांवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे पत्र मनसेकडून यापूर्वी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले होते. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला होता. मात्र, या दोन दिवसात फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई झाली नाही. तथापि मनसे पदाधिकारी मुंबईत व्यस्त असल्याने पुण्यातील आंदोलन आणखी दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मनसेकडून कालच सांगण्यात आले होते.

मात्र आज अचानक मनसेने आक्रमक होत राजारामपुलावरील फळविक्रेत्यांवर हल्ला करीत या विक्रेत्यांचे सर्व सामान, फळे रस्त्यावर फेकून दिली. त्यांचे सामान इतस्ततः फेकून दिले. या प्रकारामुळे येथील वातावरण तणावग्रस्त बनले आहे.

1 Comment

Click here to post a comment