अच्छे दिनची गावागावात चेष्टा- धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा – साडे तीन वर्षांपासून नागरिक ‘अच्छे दिन’ची वाट पहात आहेत. मात्र अच्छे दिनची गावागावात चेष्टा होऊ लागल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं.2019 साली परिवर्तन होणार आहे. राष्ट्रवादीचं सरकार येईल आणि अजित पवार प्रमुख असतील, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या शाखेच्या उद्घटनावेळी बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ‘अच्छे दिन’चं हाडूक गळ्यात अडकल्याचं म्हटलं. विदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाला 15 लाखांचं अश्वासन दिलं. मात्र जनता अजूनही पैशाची वाट पहात असल्याचं मुंडे यांनी म्हटलं.

विरोधात असताना भाजपवाले महागाईच्या गप्पा मारत होते. पेट्रोल 55 वरुन 80 वर गेलंय. गॅस, डाळीचे भाव गगनाला भिडलेत. मात्र पंतप्रधान ‘मन की बात’मधून दर कमी होईल हे सांगत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

धान्य महाग झाल्यावर पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 6 कोटी शौचालयांचं अश्वासन दिलं. मात्र खायला अन्न नसून जनता उपाशी मरत आहे. खाये इंडिया तो ही जाये इंडिया, असं म्हणत खायलाच अन्न नसताना शौचालयाचं स्वप्न दाखवल्याचा आरोप त्यांनी केला.