कोपर्डी निकाल -विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद

टीम महाराष्ट्र देशा -अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात आज या खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळ, याचे वकील शिक्षेवर युक्तीवाद करतील. त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद होईल. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावेल.

Loading...

या खटल्यातील दोषी आरोपी नंबर दोन अर्थात संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी सुरुवातील युक्तीवाद केला. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला.

उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद

-11 जुलैला आरोपींनी पीडितेला अडवलं. आरोपी जितेंद्र शिंदेनं हात ओढून अत्याचारासाठी चारीकडे खेचलं. यावेळी मैत्रीण रडली.
यावेळी आरोपी भवाळ आणि नितीन भैलुमे हसत होते.

-निशस्त्र मुलीला हसून ओढतात. त्यामुळं शिंदेच्या कृतीचा भवाळ आणि नितीन भैलूमे आनंद घेत होते.

-नागरिक येण्याच्या भितीनं दोघांनी आपलं काम तीला नंतर दाखवू, असं शिंदेला म्हटलं. म्हणजेच आपण दोघे नंतर अत्याचार करु हा अर्थ होतो.

– त्यानंतर पीडित तरुणी दोन दिवसांनी 13 जुलैला सायंकाळी आजोबाकडे दुचाकीवरुन जात होती. यावेळी आरोपी दुचाकीवरुन लक्ष ठेवत होते.

– घराबाहेर गेलेली मुलगी घरी लवकर न आल्यानं आई पहायला निघाली. त्यावेळी पीडीत विवस्त्र पडली होती आणि त्यावेळी शिंदे पळून गेला. यापूर्वी भवाळ आणि नितीन भैलूमे यांनी आरोपी शिंदेला पळून जाण्यासाठी दुचाकी तयार ठेवली होती.

– तीन आरोपी मनोरुग्ण नव्हते. तीन आरोपी प्रौढ होते त्यांना कृत्याची जाणीव होती. त्यामुळं आरोपींना कमी शिक्षा दिल्यास समाजात तो पुन्हा असं करणार नाही याची खात्री नाही.

-त्यामुळं दोषी ठरवल्यामुळे त्यांना पश्चाताप आणि दुःख नाही, आरोपी जितेंद्र शिंदे कमी शिक्षेची मागणी केली नाही. त्यामुळं जन्मठेपने सुधारणार नाही. शिंदेनं शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवस काय असं म्हटलंय.

-त्याचबरोबर भवाळ आणि नितीन भैलूमे यांना पश्चाताप नाही. कमी शिक्षा दिल्यास सुधारणा होईल का हा प्रश्न आहे.

– 13 जुलैला घटनेवेळी आरोपी शिंदेनं दोघांना भवाळ आणि नितीन भैलूमे यांना मोबाईल फोनवर मिस्ड कॉल केला होता. यावेळी भवाळ आणि नितीन भैलूमे नं उत्तर दिले नाही.

– 13 तारखेला आरोपी सात वाजता चकरा मारत होते तर त्यानंतर आत्याचार झाला आणि नंतर मिस्ड कॉल केलाय.
आरोपी शिंदेचं माळ घटनास्थळी सापडली.

-यांचं भविष्यात पुनर्वसन होण्याची शक्यता कमी आहे. तीनही आरोपींनी क्रूरपणे आत्याचार आणि हत्या केली. ही विकृती आहे. त्यामुळं जितेंद्र शिंदेला फाशी शिक्षा देण्याची मागणी

3 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...