लष्कराच्या ऑल आऊट ऑपरेशनला मोठे यश ;६ महिन्यात ८० दहशतवाद्यांना कंठस्नान

भारतीय लष्कराची जम्मू - काश्मीरमध्ये दमदार कामगिरी

टीम महाराष्ट्र देशा- जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशनला मोठे यश मिळताना दिसत आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये भारतीय लष्कराने ८० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मात्र दहशतवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण काश्मीरमध्ये अद्याप ११५ दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. यातील १०० दहशतवादी स्थानिक असून १५ दहशतवादी देशाबाहेरील असल्याची माहितीदेखील लष्कराने दिली.

गुरुवारी रात्री उशिरा जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन जवान शहीद झाले. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. याशिवाय अनंतनागमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. यानंतर लष्कराच्या ऑल आऊट ऑपरेशनबद्दल व्हिक्टर फोर्सच्या जीओसींनी (जनरल ऑफिसर कमांडिंग) प्रसारमाध्यमांना माहिती दिली. गेल्या ६ महिन्यांमध्ये ८० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...