साखर धंदा तसा फायद्याचा नाही,पण कारखाने बंद केले तर माझे …..-गडकरी

टीम महाराष्ट्र देशा-‘साखर धंदा तसा फायद्याचा नाही तो चालवतांना नाकी नऊ येतात. मात्र मी जर साखर कारखाना बंद केला तर माझे १४ आमदार आणि ५ खासदार निवडून येणार नाहीत म्हणून साखर कारखाना चालवावा लागतो’ अशी कबुली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

सध्या साखरेच्या दारावरून मोठ्याप्रमाणत राजकारण सुरु आहे या पार्श्वभूमीवर गडकरी बोलत होते. साखर कारखाने आणि त्या सोबत तालुक्याचे व जिल्हाचे राजकारण जोडलेले असते त्यामुळे साखर कारखाने स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावतात

ते अहमदनगर जिल्ह्यातील युटेक या खासगी साखर कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थीत होत्या.