शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोसाठी 3 कंपन्या ठरल्या पात्र

टीम महाराष्ट्र देशा –  महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) केल्या जाणा-या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो प्रकल्पासाठी टाटा रिलायन्स- सिमेन्स, आयएलएफएस आणि आयबीआर या तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत.शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो प्रकल्पाचे सिव्हिल व रोलिंगचे काम एकच कंपनी करणार आहे. प्रत्येक कामासाठी येथे वेगळी निविदा काढली जाणार नाही.

निविदा मंजूर झाल्यानंतर संबंधित कंपनीला बाजारातून पैसे उभे करण्यास अवधी दिला जाईल. त्यानंतर मेट्रोच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पीएमआरडीए’ने पहिल्या निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण केले असून, दुसर्या टप्प्यातील कामास सुरुवात केली आहे.नोव्हेंबरमध्ये अंतिम निविदेचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर संबंधित कंपन्यांना बाजारात पैसे उभे करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात येईल. निविदेच्या पहिल्या टप्प्यात मेट्रो प्रकल्पासाठी कोणती निविदा पात्र आहे. याबाबतच्या पाहणीनुसार एका लाईनवर सुमारे 3 लाख वाहतूक होणे आवश्यक आहे.

प्रकल्पाची रक्कम 8 ते 10 वर्षांत वसूल होणार असल्याने तांत्रिक, कायदेशीर, आर्थिक हे सर्व पैलू पहिल्या टप्प्यात पडताळून पाहण्यात आले आहेत.शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो प्रकल्पाचे सिव्हिल व रोलिंगचे काम एकच कंपनी करणार आहे. प्रत्येक कामासाठी येथे वेगळी निविदा काढली जाणार नाही. निविदा मंजूर झाल्यानंतर संबंधित कंपनीला बाजारातून पैसे उभे करण्यास अवधी दिला जाईल. त्यानंतर मेट्रोच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल. – किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

You might also like
Comments
Loading...