fbpx

नरेंद्र मोदी भारतीय अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस देतात – डोनाल्ड ट्रम्प

modi-trump

टीम महाराष्ट्र देशा –अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आसिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन (अ‍ॅपेक) परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने विस्मयजनक प्रगती केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. व्यापारनीतीवरून ट्रम्प यांनी याच परिषदेमध्ये चीनवर मात्र निशाणा साधला.

अॅपेक परिषदेच्या पार्श्वभूमीवर  मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या परिषेदत बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारत हा सार्वभौम देश आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी आहे. खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिक उपाययोजना करून अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस देत आहे.

देशातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम मोदी करीत आहेत. खुल्या अर्थव्यवस्थेने भारतीय विकास दरात झालेली वाढ कौतुकास्पद आहे. यामुळे भारतातील मध्यमवर्गीयांना नवी कवाडे खुली झाली आहेत. तर जगातील अन्य देशांना भारतात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीयांसाठी मोदी यशस्वीपणे कार्यरत आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींसह भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. या परिषदेमध्ये त्यांनी चीनचा नामोल्लेखही टाळला. चीनच्या व्यापारनीतीबाबत त्यांनी या बैठकीत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मोदी भारत-आशियन परिषदेसाठी रविवारी फिलिपाईन्सला रवाना होत आहेत. पूर्व-आशिया परिषदेमध्ये ट्रम्प उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये मोदी आणि ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे.

1 Comment

Click here to post a comment