कोणत्याही संघटनेने स्टेशन परिसर मोकळा केला नाही – फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा- अवैध फेरीवाल्यांना काढण्याचं काम सरकारचं असून त्यांना आम्ही काढूच  मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. कोणत्याही संघटनेने स्टेशन परिसर मोकळा केलेला नाही, आमच्या संयुक्त टीमने हे काम केलं आहे, असं मतही मुख्यमंत्र्यांनी मांडलं आहे.फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर असून त्यांना हटवायला हवं यात दुमत नाही, पण त्याला मराठी-अमराठी रंग देणं अयोग्य,  असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. फेरीवाल्यांच्या वादाला मराठी-अमराठी रुप देऊन राजकीय पोळी भाजणं चुकीचं असल्याचंही चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे

bagdure

फेरीवाला धोरण मंजूर करुन नियमही बनवले असून, मुंबई महापालिकेकडून त्याची अंलबजावणी सुरु आहे, असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ समीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

You might also like
Comments
Loading...