नैराश्याग्रस्त आहात ? भजन-किर्तन ऐका

संस्कार आणि भजन-किर्तनाने नैराश्य, मानसिक ताण-तणाव दूर होतो- जेएनयू

टीम महाराष्ट्र देशा- संस्कार आणि भजन-किर्तनाने नैराश्य, मानसिक ताण-तणाव दूर होऊ शकतात, असे निरीक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) संस्कृत अभ्यास केंद्राने नोंदवले आहे. मानसिक आजार नियंत्रणात आणण्यासाठी औषधांपेक्षा हे उपाय अधिक परिणामकारक आहेत, असा दावाही करण्यात आला आहे.

लहानपणीच नैतिक मूल्ये आणि संस्काराचे धडे मिळतात त्यांना पुढील आयुष्यात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत नाही. मानसिक आजार आणि नैराश्यावर मात करण्यासाठी योगासने करणे अधिक फायद्याचे असते, असे संस्कृत विभागाचे प्राध्यापक सुधीर कुमार यांनी सांगितले. विभक्त कुटुंबपद्धती हेही तरुणांमधील मानसिक तणावाचे कारण असते. मानसिक तणावावर उपलब्ध औषधांनी केवळ शारीरिक आजार बरे होतात, पण मानसिक नाहीत, असाही दावा संस्कृत विभागाने केला आहे.