आम्हाला लाठ्या-काठ्या घेऊन मुलं पाठवण्याची हौस नाही,पण ….- बाळा नांदगावकर

टीम महाराष्ट्र देशा – “हायकोर्टाने आधीच 150 मीटरच्या आत फेरीवाल्यांना मनाई केलेली आहे. आम्हाला लाठ्या-काठ्या घेऊन मुलं पाठवण्याची हौस नाही. पण अनाधिकृत फेरीवाल्यांना किती काळ आम्ही सहन करायचा, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं.”, असे नांदगावकर म्हणाले.

मनसेला भाजप रसद पुरवते, हे आरोप बिनबुडाचे आहेत. हे आरोप आमच्यावर विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाही झाले. सरकार त्यांचं काम करेल, आम्ही आमचं काम करु, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

“यापुढे रेल्वे, पोलीस आणि बीएमसीने फेरीवाल्यांवर कारवाई केली नाही, तर त्यांच्या विरोधात आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करु, असा इशाराही बाळा नांदगावकरांनी दिला.

You might also like
Comments
Loading...