लक्ष द्या, अन्यथा नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन मिळेल – शरद पवार

अन्यथा नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन मिळेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय.

टीम महाराष्ट्र देशा – गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडत असलेल्या उद्योगधंद्यांवर लक्ष द्या, अन्यथा नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन मिळेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

या प्रश्नावर राजकारण न करता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बैठक घेण्याचा आग्रह करणार असल्याचंही पवार म्हणालेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी आज शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांसारख्या विविध समाज घटकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि योग्य ठिकाणी त्यांचा पाठपुरवठा करण्याचं आश्वासन दिलं.

सरकारने वेळीच यावर लक्ष दिले नाही तर नक्षलवादाला पुन्हा एकदा प्रोत्साहन मिळेल. या प्रश्नावर राजकारण न करता आपण उद्या मुंबईला गेल्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून या बाबतीत बैठक घेण्याचा आग्रह करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

You might also like
Comments
Loading...