मोदींवर व्यक्तीगत टीका नको; राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा –  कोणत्याही स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करू नये, असे आदेश राहुल गांधीनी  पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत.गुजरातमधील स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की, आपण केवळ मोदींना व्यक्तीगत लक्ष्य करून प्रचार करणार नाही आहोत. तर, गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस सकारात्मक मुद्द्यावरही प्रचार करणार आहे. गुजरातमधील प्रचारमोहीम ही ‘आपली इच्छा आमचा संकल्प’ या विचारावर आधारलेला असेल. तसेच, कॉंग्रेसचे सरकार आल्यावर आपण कोणत्या मुद्द्यांवर भर देणार आहोत यावरही प्रचारादरम्यान भर देण्यात यावा, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 

You might also like
Comments
Loading...