सोयाबीन दरासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा- सोयाबीनला दर मिळत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सोयाबीनची पोती ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. तसंच जिल्हा नियोजन समितीच्या सभेसाठी आलेले पालकमंत्री विजय शिवतारे आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या गाड्यांचा ताफा अडवून जाब विचारण्यात आला.

यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केल्यानं तणावसदृश्य वातावरण निर्माण झालं. आंदोलनकर्त्यांनी सोयाबीन मंत्र्यांच्या ताफ्यावरही फेकले. पालकमंत्री विजय शिवतारे आपल्या गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. यावेळी संतप्त शेतकर्यांनी पालकमंत्र्यांना सोयाबिनला भाव मिळत नसल्यानं जाब विचारला.

You might also like
Comments
Loading...