जो खेळ करायचा आहे, तो खेळण्यातील नोटांशी करा; अर्थव्यवस्थेशी नको- जयंत पाटील

jayant patil

टीम महाराष्ट्र देशा – मोदीजी, आपल्याला जो खेळ करायचा आहे, तो खेळण्यातील नोटांशी करा. भारतीय अर्थव्यवस्थेशी नको, अशा आशयाचे पत्र लिहून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोदींना खेळण्यातल्या नोटा पाठवल्या आहेत. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

“नोटाबंदी लागू करताना या देशातील जनतेला आपण काळापैसा मुक्त भारत, दहशतवादाला संपूर्ण आळा आणि नंतर मग कॅशलेस अर्थव्यवस्था अशी असंख्य स्वप्न दाखवली होती. या जनतेने देखील आपण या देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्यावर विश्वासही ठेवला होता.मात्र, या एक वर्षामध्ये नेमके यातून काय साध्य झाले व कोणत्या निकषांवर नोटाबंदीचे मोजमाप करावे?, असाच प्रश्न आज सामान्य जनतेला पडलेला आहे.”, असेही जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...