राष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकर अखेर पोलिसांना शरण

dipak mankar

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक दीपक मानकर हे पोलिसांसमोर हजर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळत 10 दिवसांत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. लष्कर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त समोर ते हजर झाले आहेत.

जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, याप्रकरणी अटक टाळण्यासाठी मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत दहा दिवसांत पोलिसांना शरण येण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते.

पुन्हा एकदा हायकोर्टाचा दीपक मानकरांना दणका !Loading…
Loading...