….तर जीएसटी पूर्णपणे बदलू – राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा – २०१९ मध्ये केंद्रात काँग्रेसचं सरकार आल्यास व्यापारी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संपूर्णपणे बदलून टाकू’, असं आश्वासन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं. हिमाचल प्रदेशातील नाहन येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी हे आश्वासन दिलं.

राहुल गांधी यांनी या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली. यावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश सरकारवर केलेल्या आरोपांचा समाचारही घेतला. ‘२०१९ मध्ये आम्ही केंद्रात सत्तेत आल्यावर जीएसटीमध्ये पूर्णपणे बदल करू. जनतेचा त्रास कमी होण्यासाठी जीएसटीत बदल करू’, असं ते म्हणाले.

नीती आयोगाच्या अहवालानुसार इतर राज्यांच्या तुलनेत हिमाचल प्रदेशातील भ्रष्टाचाराचा स्तर खूप कमी आहे. गुजरात आणि हिमाचलची विकासाबाबत तुलना केल्यास हिमाचल प्रदेश गुजरातपेक्षा सरस असल्याचंही राहुल यांनी ठणकावून सांगितलं.

You might also like
Comments
Loading...