त्या नराधमांनी माझ्या  छकुलीला बुधवारीच मारल आणि न्यायालयाने शिक्षा देखील बुधवारीच सुनावली

टीम महाराष्ट्र देशा -त्या नराधमांनी माझ्या  छकुलीला बुधवारीच मारल आणि न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा देखील बुधवारीच सुनावली. असे उद्गार  निर्भायाच्या आईने काढले.कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील तिघाही दोषींना कोर्टाने बुधवारी सकाळी फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने तिन्ही दोषींनी फाशीची शिक्षा सुनावल्यावर निर्भयाच्या आईला कोर्टात अश्रू अनावर झाले. माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावूक प्रतिक्रिया निकालानंतर निर्भायाच्या आईने दिली.

आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर विश्वास होता. पोलीस विभागाने त्यांच्या तपासातून छकुलीला न्याय मिळवून दिला आहे, असंही निर्भयाच्या आईने पुढे म्हंटलं. मी शेवटपर्यंत लढणार, कोणत्याही छकुलीसाठी असाच लढा देणार, असं भावनिक मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना निर्भायाची आई ओक्साबोक्सी रडू लागली. ‘मराठी समाज, विद्यार्थी, मुख्यमंत्री, भय्यूजी महाराज यांनी खूप साथ दिली. मराठी समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला. सर्व समाजांचे, महाराष्ट्राचे मी आभार मानते,” असं निर्भयाची आई म्हणाली.

‘प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते,’ असे भावुक उद्गारही आईने काढले. यावेळी त्यांना शब्दही फुटत नव्हते.सर्व दोषींना फाशीची शिक्षा मिळाली असली तरी ते निकालाविरुद्ध हायकोर्टात दाद मागू शकतात. याविषयी विचारलं असता निर्भयाची आई म्हणाली की, “पहिली लढाई जिंकली आहे. पण न्यायासाठी आणि दोषींना फासावर लटकवण्याठी शेवटपर्यंत लढा देणार. यापुढे कोणत्याही छकुलीवर अत्याचार झाल्यास मी धावून जाईन, असंही त्या म्हणाल्या.