भाजपची डोकेदुखी वाढणार;शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार

टीम महाराष्ट्र देशा-   शिवसेना महाराष्ट्र भाजपसोबत सत्तेत असून देखील भाजपाला विरोधी पक्षाप्रमाणे कडाडून विरोध करीत आहे. सेनेने भाजपला महाराष्ट्र आव्हान देऊन नाकी – नऊ आणले आहेत. आता गुजरात मध्ये देखील सेना भाजपची डोकेदुखी वाढविण्यास सज्ज होत आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नाही. या भूमिकेवरुन शिवसेनेनं यू-टर्न घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं गुजरातच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी आणखी वाढू शकते. 40 हून अधिक जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे हिंदुत्वावादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भाजपला भोगावा लागू शकतो.

यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. असं म्हटलं होतं. पण आता अचानकपणे शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे.

एकीकडे भाजपला गुजरातमध्ये हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांचा सामना करायला लागत असताना दुसरीकडे शिवसेनेनं थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

You might also like
Comments
Loading...