राणेंना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी एकवटली

congress ncp

टीम महाराष्ट्र देशा –  नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेची ७ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्या जागेसाठी भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून राणे यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेत्यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे.
कांग्रेस प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, जयंत पाटील उपस्थित आहेत.

Loading...

राणे यांनी राजीनामा दिलेली ही जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे या जागेवर अशोक चव्हाण यांच्यासह सर्व नेत्यांनी दावा केला आहे. यावर राष्ट्रवादी कोणती भूमिका घेईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आपल्या नेत्यांवर तोंडसुख घेणाऱ्या राणे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न आहेत. तर, राणे पुन्हा निवडून आल्यास आपलल्याला वेसन लागेल, अशी भीती राष्ट्रवादीला वाटत आहे. त्यामुळे हे दोन्हीही पक्ष आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेऊन चर्चा करीत आहेत.Loading…


Loading…

Loading...