राम शिंदे यांना स्वच्छतादूत करा

ram shinde caught urine at public place

टीम महाराष्ट्र देशा-  जागतिक शौचालय दिनी उघड्यावर लघुशंका करणारे राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची, सरकारने स्वच्छ भारत अभियानाचे ‘स्वच्छतादूत’ म्हणून नेमणूक करावी, अशी उपरोधिक मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.

रविवारी बार्शी तालुक्याच्या दौºयावर असताना, मंत्री राम शिंदे उघड्यावर लघुशंका करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलवरून प्रसारित झाला आहे. या व्हिडीओवरून सावंत यांनी सरकारला टीकेचे लक्ष्य केले.

राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. परंतु, आरटीआयखाली मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांत स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत केवळ १,६२४ शौचालये बांधली गेली. त्यातही अनेक वार्डात एकही शौचालय नाही. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत महिलांकरिता ५० हजार शौचालये बांधू, अशी घोषणा केली होती. तीही अपूर्ण आहे. मंत्री राम शिंदे यांनी उघड्यावर बसून सरकारच्या दाव्याची पोलखोलच केली आहे, असा टोमणा सावंत यांनी मारलाLoading…
Loading...