उत्तर भारतीय हे मुंबईची शान ; पूनम महाजन यांनी तोडले अकलेचे तारे

मुंबईतील उत्तर भारतीयांची ताकद नाकारता येणार नाही

टीम महाराष्ट्र देशा –  उत्तर भारतीय व मुंबई आणि त्यातून निर्माण होणार वाद हे नेहमीचच समीकरण झाले आहे. मनसे उत्तर भारतियांच्या विरोधात नेहमीच आक्रमक असतात. मनसे ने अनेक वेळा अनेक मुद्द्यावर उत्तर भारतीयांच्या  विरोधात अनेक आंदोलने केली आहे . मनसेची उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका आणि फेरीवाला हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

उत्तर भारतीय हे मुंबईची शान आहेत. ते मेहनतीने मुंबईच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भाषा आणि प्रांताच्या नावावर देशाची विभागणी होता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे.साकीनाका येथे साईश्रद्धा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उत्तर भारतीय संमेलनात महाजन बोलत होत्या.

येथे येणारा मुंबईचाच होऊन जातो. उत्तर-दक्षिण भारत हीच खरी संस्कृती आहे, असेही त्या म्हणाल्या. मुंबईतील उत्तर भारतीयांची ताकद नाकारता येणार नाही. उत्तर भारतीयांनी देशाला अनेक बडे नेते आणि पंतप्रधान दिले आहेत. पंतप्रधान मोदीही वाराणसीतून निवडून आले आहेत. उत्तर भारतात दौऱ्यांवेळी माझ्यासारख्या मराठी मुलीला खूप सन्मान मिळाला आहे आणि यापुढेही मिळेल, असेही त्या म्हणाल्या. ‘आम्ही उत्तर भारतीय प्रामाणिक आहोत. बंडखोर आहोत. कुणी आमच्या वाट्याला गेले तर त्यांना सोडत नाही.’ असे वक्तव्य मुंबई भाजपचे उपाध्यक्ष राजहंस सिंह यांनी केले.

You might also like
Comments
Loading...