एलफिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रीज भारतीय सैन्य बांधणार

टीम महाराष्ट्र देशा- एल्फिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रीजचा प्रश्नही समोर आला होता. यावर तोडगा काढण्यासाठी हा ब्रीज भारतीय सैन्यांकडून बांधला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी केली.

यावेळी ही घोषणा करण्यात आली. 5 नोव्हेंबरपासून भारतीय सैन्य फूटओव्हर ब्रीजच्या बांधकामाला सुरुवात करणार आहे. 31 जानेवारीपर्यंत पुलाचं बांधकाम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.