इट का जवाब पथ्थर से मिलेगा; मनसेचा काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक

mumbai congress

टीम महाराष्ट्र देशा – मुंबईतील फेरीवाल्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने वेगळे वळण घेतले आहे. मनसे- कॉंग्रेस आमने सामने आले आहेत.मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. असे टि्वट केले आहे.