चंद्रकांत पाटलांनकडे आमदार खरेदी करण्याइतके पैसे आले कोठून ? संजय राऊतांचा सवाल

chandrakant patil vs sanjay raut

टीम महाराष्ट्र देशा – चंद्रकांत पाटील यांनी ५ कोटी रुपये देऊन शिवसेनेच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट हर्षवर्धन जाधव यांनी केला. चंद्रकांत पाटील यांच्याकडे शिवसेना आमदार खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले, याची ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणारे भाजपचे खासदार आता गप्प का बसले आहेत? असा प्रश्नही उपस्थित करून राऊतांनी किरीट सोमय्यांनाही टोला हाणाला आहे. तर आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जायला आपण तयार असल्याचं, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.