डी एस कुलकर्णींवर आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम महाराष्ट्र देशा – पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करायला सुरूवात केलीय.

आज सकाळी डीएसकेंच्या सेनापती बापट मार्गवरच्या घरी आणि जंगली महाराज रोडवरच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापा घातलाय. या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी तपास करण्यात येत आहेत.

गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अनसरुनच ही कारवाई सुरू झालीय.

डीएसकेंनी गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या पार्श्वभूमीवर डीएसकेंच्या विरोधातील सर्व तक्रारी आधीच्या गुन्ह्यात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलय. त्याचप्रमाणे डीएसकेंच्या सर्व मालमत्ता संरक्षित करण्यासाठी पोलिसांकडून अर्जदेखील करण्यात येणार आहे.

– 

You might also like
Comments
Loading...