मनसेचे मुख्यमंत्र्यांना आंबेडकरांच्या शब्दांत उत्तर

टीम महाराष्ट्र देशा – परप्रांतीयांमुळं मुंबई महान बनत असल्याचा दावा करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेनं पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.फडणवीसांच्या उत्तर देण्यासाठी मनसेनं महाराष्ट्राचे सुपुत्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई व महाराष्ट्राबद्दल व्यक्त केलेल्या मताचा आधार घेतला आहे. तशी एक पोस्टच मनसेच्या फेसबुक व ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्राच्या अस्मितेवर वरवंटा फिरवून मुंबईतील मराठी माणसाचे, त्याच्या अस्तित्वाचे सतत खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या भाजप नेत्यांनी सुरू केलाय. या महाराष्ट्रात काही ताठ कण्याचे, मराठी बाण्याचे देशव्यापी नेतेही झाले, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, असा टोला मनसेनं मुख्यमंत्र्यांना हाणला आहे.

bagdure

 

You might also like
Comments
Loading...