fbpx

तर भाजप ही मुंबईची घाण

टीम महाराष्ट्र देशा – उत्तर भारतीय हे मुंबईची खरी शान आहेत. ते आपल्या मेहनतीने मुंबईच्या विकासात योगदान देत आहेत, असं पूनम महाजन यांनी म्हटलं होतं या पार्श्वभूमीवर भाजप खासदार पूनम महाजन आता मनसेच्या निशाण्यावर आल्या आहेत. भाजप मुंबईची घाण आहे, अशा शब्दात मनसे नेेते संदीप देशपांडे यांनी पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिलंय.रविवारी मुंबईतील साकीनाकामध्ये उत्तर भारतीय संमेलन आणि कलाकारांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा पूनम महाजन यांनी हे वक्तव्य केलं होतं

उत्तर भारतीय व मुंबई आणि त्यातून निर्माण होणार वाद हे नेहमीचच समीकरण झाले आहे. मनसे उत्तर भारतियांच्या विरोधात नेहमीच आक्रमक असतात. मनसे ने अनेक वेळा अनेक मुद्द्यावर उत्तर भारतीयांच्या  विरोधात अनेक आंदोलने केली आहे . मनसेची उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका आणि फेरीवाला हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.