जे निर्णय घेतले त्याची राजकीय किमंत चुकवण्यास तयार – मोदी

टीम महाराष्ट्र देशा – 2014 मध्ये आम्ही सत्तेवर आलो तेव्हा विरासतमध्ये काय मिळालं? अर्थव्यवस्था, सुशासन, बँकेची अवस्था खराब होती. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीए सरकारवर केली. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तीन वर्षात कठोर निर्णय घेतले. जे निर्णय घेतले त्याची राजकीय किंमत चुकवण्यास तयार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी ते संवाद साधत होते.

यावेळी मोदी म्हणाले की, आज भारतीय लोक जगभरात सन्मानानं जगत आहेत. ‘अब की बार कॅमरून की सरकार’ आणि ‘अब की बार ट्रम्प की सरकार’ यासरख्या स्लोगनवरुन भारताचे जगात वाढत असलेला दबदबा आणि विश्वासर्हता दिसून येतो. आम्ही भ्रष्टाचारविरोधात कडक पावले उचलली असून ईको-सिस्टम करण्याच्या प्रयत्नात आहोत. ज्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही. ही ईको-सिस्टम विकास आणि लोकांवर आधारित असेल. भविष्यात भ्रष्टाचारविरोधात अणखी कडक पावले उचलली जातील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले

यावेळी ते म्हणाले की, 2014 मध्ये जेव्हा आम्ही सत्तेत आलो त्यावेळी आम्हाला विरासतमध्ये काय मिळाले? अर्थव्यवस्था, सुशासन आणि बँकेची खराब अवस्था त्यामुळे भारताची तुलना कमकुवत देशामध्ये केली जात असे. सत्तेत आल्यानंतर मी भ्रष्टाचारविरोधात कडक पावले उचलली, जर मला याची राजकीय किंमत चुकवावी लागली तर मी तयार आहे.