कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला मोठा धक्का

टीम महाराष्ट्र देशा- कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय कल्याण सत्र न्यायाल्याने दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.याआधीही 2012 साली देवळेकर यांना आपलं नगरसेवक पद गमवाव लागलं होतं.

वैश्य वाणी समाजाला ओबीसी मधून वगळण्यात आल्यानं आपोआपच त्यावेळी त्यांचं नगरसेवकपद सुद्धा रद्द झालं होतं. मात्र पुन्हा 2015 साली झालेल्या निवडणुकीत देवळेकर निवडणूक लढले आणि जिंकून आले. याला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे अर्जुन म्हात्रे यांनी न्यायाल्यात आव्हान दिले. एकदा नगरसेवक पद रद्द झाल्यावर 6 वर्ष निवडणूक लढता येत नसूनही पुन्हा वाणी ही जात लावून निवडणूक लढवणे हे बेकायदा असल्याचा दावा करत म्हात्रे यांनी कोर्टात धाव घेतली होती.

bagdure

दरम्यान या निर्णयाला सत्र न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्यासाठी एक महिन्याची स्थगिती दिली असून उच्च न्यायालयात या विरोधात जाणार असल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्पष्ट केलं.याबद्दल विचारलं असता राजेंद्र देवळेकर म्हणाले, ‘ कल्याण न्यायालयाने माझी निवडणूक रद्दबातल ठरवण्याचा निर्णय दिला आहे. परंतु त्याच न्यायालयाने या निर्णयास अपील पिरियड पर्यंत म्हणजेच मा.उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

sena rajendra devlekar
file photo

 

You might also like
Comments
Loading...