अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

टीम महाराष्ट्र देशा – अरविंद केजरीवाल हे संपूर्ण देशाला माहित असलेले नाव आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर राजकारण आणि रातोरात दिल्लीचे मुख्यमंत्री पद व काही तासात राजीनामा अरविंद केजरीवाल यांचा हा जीवन प्रवास संपूर्ण देशाने पाहिला आहे. आता लवकरच तो चित्रपटगुहात अनुभवता येणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील ‘एन इनसिग्निसफिकेंट मैन’ हा चित्रपट १७ नोहेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विजय शुक्ला व खुशबू रांका यांनी हा चित्रपट बनविला आहे. या चित्रपटातून राजकीय पक्षाचे खरे रूप समोर येणार असल्याचा दावा विजय शुक्ल यांनी केला आहे.