मनसे आणि सेना कार्यकर्ते भिडले

टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाला मुद्यावरुन काँग्रेस मनसेनंतर आता मनसे विरुद्ध सेना चांगलाच संघर्ष पेटलाय.काल रात्री उशीरा मुंबईतील पायधुनी भागात शिवसेनेच्या मांडवी शाखेत फेरीवाला विषयावरून बैठक सुरु होती. या बैठकीत अचानक मनसैनिक पोहोचले आणि सेना मनसे कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची होऊन धक्काबुक्की देखील झाली.

अशातच काही फेरीवाला आणि मनसैनिक यांच्यात हाणामारी झाल्याचे देखील बोलले जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी वैभव शिंदे, योगेश नेहरकर, महेंद्र जाधव आणि रोहन चाळके या चार मनसैनिकांना अटक केली.दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने फेरीवाल्यांना समर्थन दिले होते. मनसै पेटवलेला फेरीवाला मुद्दयाला शिवसेनेचा विरोध पाहता मनसैनिक आणि शिवसेना यांच्या खंडाजंगी होईल हे स्पष्ट झालं होतं. त्याची सुरुवात काल रात्री उशीरा पासधुनी येथून झालीये.

You might also like
Comments
Loading...