राणेंच्या राजकीय कारकीर्दीचा फैसला ७ डिसेंबरला

narayan rane

टीम महाराष्ट्र देशा – नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 7 डिसेंबरला ही निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान शिवसेना आणि काँग्रेस यांचा राणे विरोध बघता ही निवडणूक राणेंना सोपी जाणार नसल्याची सध्याची राजकीय समीकरणं सांगत आहेत.

राणेंना पुन्हा विधानपरिषदेवर निवडून यायचं असेल, तर या निवडणूकीत शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी एका पक्षाचा पाठिंबा मिळावावा लागेल. त्यापैकी शिवसेना आणि काँग्रेस राणेंना पाठिंबा देणं शक्य केवळ अशक्य आहे. त्यामुळे या निवडणूकीत फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात होण्याच अटळ असल्याचं स्पष्ट दिसंतय.