ओला,उबेरचे भाडे हिवाळी अधिवेशनानंतर ठरवणार

टीम महाराष्ट्र देशा- मोबाईल ऑप्लिकेशनवर आधारित सेवा पुरविणाऱया ओला, उबेर टॅक्सीचे निश्चित भाडे नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर ठरविणार असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ञ समितीने हायकोर्टात दिली. अॅप बेस टॅक्सींचे दर ठरविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात ओला, उबेर कंपन्यांसह इतर सहा जणांनी धाव घेत याचिका दाखल केली होती.

त्यावर न्यायमूर्ती एस. एम. केमकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.अॅप बेस टॅक्सींचे दर ठरविण्यासंदर्भात समिती नेमण्यात आली असून सध्याच्या दरात काही सुधारणा या समितीने नोंदविली आहे.अशी माहिती सरकारी वकील जी. डब्ल्यू मॅथ्योस यांनी खंडपीठासमोर दिली. दरासंदर्भातील अहवाल हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असून सरकार त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेईल, असे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.

You might also like
Comments
Loading...