दशक्रिया चित्रपट वाद ;चित्रपटगृहाला सुरक्षा देऊ पण चित्रपट सुरू ठेवा – संभाजी ब्रिगेड

ब्राह्मण महासंघ आणि संभाजी ब्रिगेड आमने-सामने

टीम महाराष्ट्र देशा –  दशक्रियावरून ब्राह्मण महासंघ-संभाजी ब्रिगेड आमने-सामने आले. संभाजी ब्रिगेडने चित्रपटगृहाला सुरक्षा देऊ पण चित्रपट सुरू ठेवा अशी मागणी प्रशासनाकडे केली.मात्र यानंतरही ब्राह्मण संघाने घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने चित्रपटाचा शो बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने तुर्तास घेतला आहे. ब्राह्मण महासंघ आणि संभाजी ब्रिगेड आमने-सामने येण्याची ही पहिलीच घटना असावी.