उद्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये माढा तालुका सक्रिय सहभागी होणार

kurduwadi sakal maratha 1

कुर्डूवाडी प्रतिनीधी : मराठा समाजाने पुकारलेल्या 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद मध्ये सोलापुर जिल्ह्यातील सकल मराठा समाज पुर्ण सक्रिय होऊन सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक संजय टोणपे आणि हर्षल बागल यांनी दिली.

उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व शाळा, महाविद्यालय, सर्व दुकाने,हॉटेलस्, मंडई, मार्केट कमिटी, औद्योगिक वसाहत, एस.टी.सेवा, पोस्ट ऑफिस डाक सेवा, सर्व नगरपरिषद कार्यालय, ग्रामपंचायती कार्यालय, तलाठी कार्यालय, सर्व तालुका पंचायत समिती कार्यालय, प्रांत कार्यालय बंद राहणार आहेत. कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात झालेल्या पोलिस आणि आंदोलक यांच्या सुसंवाद बैठकित झाली अशी माहिती सकल मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक हर्षल बागल यांनी दिली.kurduwadi sakal maratha

 

उद्याच्या बंद मध्ये हाँस्पिटल, मेडिकल, त्याचबरोबर पेट्रोल पंप या आत्यावश्यक सेवा सुरु राहतील अशीही घोषणा यावेळी समन्वयकांनी केली आहे. पोलिसांबरोबर सुसवांद ठेवुन शांततेत आंदोलन करावे, कोठेही जाळपोळ, मोडतोड तोडफोड करु नये असेही आंदोलकांना आवाहन संजय टोणपे यांनी केले आहे. अतिसंकट समयी गरजुंना मदत करा अशाही सुचना समन्वयकांनी दिल्या आहेत. तसेच यानिमित्ताने आंदोलकांवरील गुन्हे माघारी घ्यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

मराठा आंदोलन : कुर्डूवाडीत आंदोलकांनी बोकडाला बनवले मुख्यमंत्री

२१ दिवसांपासून सुरु असणारंं ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित

धुळ्यात मराठा आंदोलनास हिंसक वळण ; हिना गावित यांच्या वाहनांची तोडफोड