लिंगायत महामोर्चासाठी आजी- माजी नगरसेवकांनी बैठका घ्याव्यात

टीम महाराष्ट्र देशा – सांगली येथे आयोजित लिंगायत समाजाचा महामा भूतो ना भविष्यती असा होण्यासाठी सांगली महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय बैठकांचे नियोजन करा. सर्वपक्षीय व सर्वधर्मिय यांच्या सहकार्याने हा महामोर्चा अभूतपूर्व झाला पाहिजे, हे ध्येय बाळगून लिंगायत समाजबांधवांनी सक्रीय व्हावे, अशी सूचना लिंगायत महामोर्चा समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली. सांगली येथे दि. ३ डिसेंबर रोजी आयोजित लिंगायत महामोर्चाच्या पूर्वतयारीनिमित्त सांगली महापालिकेच्या आजी- माजी नगरसेवकांची बैठक येथील सांगली जिल्हा लिंगायत बोर्डिंगमध्ये पार पडली.

त्यावेळी लिंगायत महामोर्चा समन्वय समितीच्या पदाधिका-यांनी या सर्वांना या समाज लढ्यात सक्रीय होण्याची विनंती केली. या महामोर्चानिमित्त संपर्कासाठी सांगली- मिरज रस्त्यावरील रणजित एम्पायर या सदनिकेत जागा निश्चित करून या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन सोमवारी करण्याचे जाहीर केले. आपल्या न्याय मागण्यांसाठी आयोजित महामोर्चा यशस्वी करण्यासाठी लिंगायत समाजातील आजी- माजी नगरसेवकांसह डॉक्टर, वकील, व्यावसायिक व विविध घटक अशी विभागणी करावी व त्या माध्यमातून या महामोर्चासाठी सर्वस्वी ताकद पणाला लावूया, अशी सूचना सांगली महापालिकेचे माजी महापौर विजय धुळुबुळू यांनी मांडली.

सांगली जिल्हा लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने व सांगली महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी लिंगायत समाजाअंतर्र्गत समन्वय समिती स्थापन करून त्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष, संघटना व सर्वधर्मिय प्रमुखांची भेट घेऊन या महामोर्चासाठी पाठिंबा मिळवूया व लिंगायत समाज बांधवांसाठी समाजातील इतर घटकही मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरेल, या पध्दतीने तयारी करूया, यासाठी नियोजन करण्याचे सुचविले. सांगली महापालिकेतील स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक शिवराज बोळाज व कॉंग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे यांनी लिंगायत समाजातील युवक, युवती व महिला यांच्या स्वतंत्र समित्या करून त्या माध्यमातून या महामोर्चाची तयारी करण्याची भूमिका मांडली

You might also like
Comments
Loading...