मी देखील राजकारणाचा बळी- विजय माल्या

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याप्रमाणे मी देखील राजकारणाचा बळी ठरलो असल्याचा  दावा विजय मल्ल्या याने केला आहे. मल्ल्या आज इंग्ल्डमधील एका कोर्टात सुनावणीसाठी आला असताना त्याने हे विधान केलं आहे.

बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याने भारतात  माझ्या जिवाला धोका आहे,’’ असा कांगावा करत आपल्या  ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयात विरोध केला. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मल्ल्याच्या वकिलांनी विजय  माल्याच्या जीवाला  धोका असल्याचे न्यायालयाला सांगितले.